निवती येथे मत्स्यविभागाची परप्रांतीय नौकेवर कारवाई
निवती
निवती येथे मत्स्यविभागाने परप्रांतीय नौकेवर कारवाई केली आहे. गोवा राज्यातील श्रीमती पल्लवी साईहर्षद धोंड, रा. पणजी, गोवा यांची नौका जय IV बॉस, नों.क्र.IND-GA-२-MM-3588 ही नौका महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात निदर्शनास आली. नौका पाठलाग करून थांबविली असता नौकेवर विधीग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे नौकेची तपासणी केली गेली. यावेळी नौकेवर अनधिकृतरित्या LED मासेमारीचे साहित्य अधिकाऱ्यांना आढळून आले. या नौकेवर नौका तांडेलसह इतर 20 खलाशी उपस्थित होते.सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक मत्स्य तेजस्विता करंगुटकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
konkansamwad 
