अणसूर-पाल हायस्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न

अणसूर-पाल हायस्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न

अणसूर-पाल हायस्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न

 

अणसूर

 

      'सुरक्षित सिंधुदुर्ग 'अभियाना अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने  पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला निसर्ग ओतारी, यांच्या मार्गदर्शनाखाली अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर येथे अमली पदार्थ व सायबर सुरक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजित करण्यात आले होते. "शालेय वय हे अतिशय संवेदनशिल वय असते त्यामुळे याच वयात विदयार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले तर ते या अमली पदार्थांच्या आहारी जाणार नाहीत व व्यसनांपासून दूर राहतील त्यामूळे पुढे भावी जीवनात देशाचा व आपल्याआईवडीलांचा नावलौकिक वाढवतील."असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी केले. ते 'सुरक्षित सिंधुदुर्ग 'अभियानांतर्गत अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रशालेत उपस्थित होते.याचवेळी मोबाइल व इंटरनेटचा अतिवापर व त्यांच्या वापराबाबत जागरुकता नसल्यामुळे होणार्‍या सायबर गुन्ह्याबाबत माहिती  देण्यासाठी निकॉम कॉम्पुटरचे संचालक प्रशांत निकम उपस्थित होते. त्यांनी मोबाईलच्या वापराबाबत सजग राहण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकर तर आभार संचिता परब यांनी मानले.यावेळी शाळेच्या माजी शिक्षिका सौ. अक्षता पेडणेकर, सहा.शिक्षिका प्रीती परब व होमगार्ड शेटकर उपस्थित  होते. विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारा 'सुरक्षित सिंधुदुर्ग' हा कार्यक्रम प्रशालेत उत्साहात संपन्न झाला.