आडेली येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न.

आडेली येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न.

वेंगुर्ला.

  विकसित भारत संकल्प यात्रा आडेली येथे दि ३० रोजी आडेली जि.प.पु.प्रा. शाळा आडेली नं.१ या सभागृहात घेणेत आला. सदर कार्यक्रमांची सुरूवात सरपंच आडेली श्रीम.यशस्वी विष्णू कोंडसकर यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅन चे श्रीफळ वाढवून  कार्यक्रमाचे उदघाटन करणेत आले. व त्यानतंर सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अनिल श्रीधर चव्हाण ग्रामविकास अधिकारी आडेली यांनी केले व कार्यक्रमाची  रुपरेशा व उद्दीष्ट अनिल श्रीधर चव्हाण ग्रामविकास अधिकारी आडेली यांनी सदर कार्यक्रमास वि.अ. ग्रा.पं. पंस. वेंगुर्ला गुरूनाथ धुरी, बँक प्रतिनिधी, प्रभाग समन्वयक राजेश्वरी परब, सरपंच यशस्वी विष्णू कोंडसकर. उपसरंपंच परेश चंद्रकांत हळणकर, सदस्य नारायण प्रकाश कोंडसकर, वर्षा बाबुराव आडेलकर, भुमिका भगवान सावंत,  प्रा.आ.केंद्र आडेली डॉ.पाटील, माजी सरंपच  शुभांगी  प्रकाश गडेकर, माजी ग्रा.पं.सदस्य  विष्णू कोंडसकर सामाजिक कार्यक्रते राजु सामंत, वजराठ सरंपच अन्यन्या पुराणिक, आडेली गावातील सर्व कर्मचारी वृंद सर्व-शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, सीआरपी, बचतगटातील सर्व महिला, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब आदी मान्सवर व ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते.
  सदर  कार्यक्रमात विद्यार्थीनी कु.अर्पीता प्रंशात धर्णे हिने विकसित भारत संकल्प अभियान प्रतिज्ञा दिली. त्यानतंर आडेली ग्रामपंचायतीस ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त झाले बाबतचे  गुरूनाथ धुरी वि.अ. ग्रा.पं. पंस. वेंगुर्ला यांनी मा. सरपंच यांच्याकडे सन्मानपत्र सुपूर्त करण्यात आले. सदर कार्यक्रमात ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर केले याचा लाभ शाळेतील व हायस्कुलच्या विद्यार्थीयानी लाभ घेतला. व  सदर कार्यक्रमांवेळी आयुष्यमान भारत कार्ड वितरण ५ लाभार्थीना केले. एमआरजीएस लाभार्थीना मंजुरी आदेश देण्यात आले. व विविध योजनांची माहीती आरोग्य विभाग, पंशुसंर्वधन, MRSLM, उमेद अभियान, बँक, कृषी, मत्स्य विभाग इत्यादी सर्व खाते प्रमुख यांनी दिली. व शाळेतिल मुलांचा प्रश्नमंजुषा उपक्रम घेणेत आला व त्यांना सन्मानित केले. व कार्यक्रमावेळी सर्वांचे आभार ग्रामविकास अधिकारी आडेली अनिल श्रीधर चव्हाण यांनी मानले.