जिल्ह्यातील २२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान, सेवा सहयोग संस्थेचा उज्वल कार्य
मुंबई
सेवा सहयोग संस्था मुंबई, भागीरथ प्रतिष्ठान, झाराप आणि तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "यांचा आनंद 100%" कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 22 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली.कार्यक्रमात सेवा सहयोग संस्था चे रविन्द्र कर्वे, जेष्ठ पत्रकार शेखर सामंत, डॉ. विवेक रेडकर, डॉ. कोलते प्रभाकर सामंत, डॉ. प्रसाद देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व त्यांचे पालकही उपस्थित होते."प्रतिकूल परिस्थितीत आव्हाने स्वीकारून उज्वल यश मिळवण्यासाठी निर्माण होणारी ऊर्जा हीच आम्हाला या मुलांचा शोध घेण्यासाठी ऊर्जा देते," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. "खेड्यापाड्यात दडलेले टॅलेंट सहकार्य केल्यास उजागर होते," असेही त्यांनी सांगितले.शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. "मुलांनी वाचन केले पाहिजे," असे आवाहनही करण्यात आले.
konkansamwad 
