पालघर, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता.

पालघर, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता.

पुणे.

  राज्यात पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील आज बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासाह वीजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठाण्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.
   पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर स्थितीत आहे. कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ७ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
    त्यामुळे कोकणात पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. २४ व २५ तारखेला रायगड व रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११५.६ मिलिमीटर ते २०४.४ मिलिमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना २४ ते २५ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव व सांगली येथे पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी पुढील दोन ते तीन दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.