आगामी निवडणुकासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न.

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच तालुका काँग्रेसच्या बैठका आयोजित करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा पदाधिकारी आणि सदस्य यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या भावना मांडल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे, अनिल डेगवेकर, विजय प्रभू, मेघनाद धुरी, रवींद्र म्हापसेकर, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, विनायक मेस्त्री, सुशील राणे, प्रदिप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, दादामिया पाटणकर, जेम्स फर्नांडिस, विधाता सावंत, एकनाथ नाईक, पांडुरंग नाटेकर, विद्याप्रसाद बांदेकर, आय.वाय.शेख, आशिष काष्टे, अमोल सावंत, व्हि.के.सावंत, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, प्रवीण मोरे, आनंद परूळेकर, अजिंक्य गावडे, अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, कृष्णा धाऊसकर, नंदकिशोर दळवी, संदेश कोयंडे, प्रमोद अणावकर इत्यादी उपस्थित होते.