कुडाळ तालुक्यातील अणावमध्ये आढळले दुर्मिळ खवलेमांजर
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.अणावकर यांनी याची माहिती वनपाल-कसाल यांना दिली. वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक कसाल ऊत्तम कांबळे, पंकज घाडी, ऊदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे, शिपाई सुनिल आंगणे हे अणाव येथे दाखल झाले. तसेच त्यांना अणाव बामणवाडीमधील ग्रामस्थ अजित अणावकर, राजन जडये, विपुल हडकर, पार्थ अणावकर यांनी त्यांना खवले मांजर पकडण्यासाठी मदत केली. वैद्यकीय तपासणीनंतर खवलेमांजरास परिक्षेत्र अधिकारी कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
konkansamwad 
