वेंगुर्ला रोटरी व इनरव्हिल क्लबच्या वतीने किशोरावस्था व समतोल आहाराविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न.
वेंगुर्ला.
रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी सदस्य व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रोटरियन विनया बाड यांचे मेनस्टृएल हायजीन ॲंण्ड मॅनेजमेंट विषयक," वयात येताना-किशोरवयीन मुलामुलींच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान , वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व इनरव्हिल क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.तसेच यावेळी त्यांनी बदलत्या जीवनशैली व ऋतुमानानुसार दररोजच्या घ्यावयाच्या समतोल आहाराविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला रोटरी प्रेसिडेंट योगेश नाईक , सेक्रेटरी नोटरी ॲड.प्रथमेश नाईक, सर्व्हिस प्रोजेक्ट चेअरमन आनंद बोवलेकर, वेंगुर्ला इनरव्हिल प्रेसिडेंट मंजुषा आरोलकर, सेक्रेटरी ज्योती देसाई,माजी इनरव्हिल प्रेसिडेंट वृंदा गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. वेंगुर्ला हायस्कूल मुख्याध्यापक पि.डी.कांबळे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले.
या प्रसंगी विनया बाड यांचे रोटरी वेंगुर्ला क्लब सन्मानचिन्ह देऊन प्रेसिडेंट योगेश नाईक यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व रोटरी सदस्य व इनरव्हिल क्लब सदस्य पूनम बोवलेकर, वृंदा गवंडळकर, रेखा नाईक, गौरी मराठे, ज्योती देसाई, रसिका मठकर, दीपाली वाडेकर, सई चव्हाण यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन लिटरसी डायरेक्टर प्रा.डाॅ.वसंतराव पाटोळे यांनी केले तर आभार इनरव्हिल प्रेसिडेंट मंजुषा आरोलकर यांनी मानले.