कुडाळ माणगाव येथे दिव्यांगांसाठी विभागीय मेळाव्याचे आयोजन

कुडाळ माणगाव येथे दिव्यांगांसाठी विभागीय मेळाव्याचे आयोजन

 

कुडाळ 

               

        भाजप दिव्यांग विकास आघाडीमार्फत दि. 11 एप्रिल रोजी माणगाव पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या स्वागत समारंभाने झाली. संस्था कर्मचारी प्रणाली दळवी यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. तसेच जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सरपंच भोसले मॅडम, पोलीस अधीक्षक वाघाटे, सावंत सर यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. मा. नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित दिव्यांग बांधवाना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्याचा 40 हून जास्त दिव्यांगांनी लाभ घेतला. त्याचबरोबर त्यांना सदस्य नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन करण्यात अले. माणगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांगाना अल्पोपहार देण्यात आला. पुनर्वसन केंद्राच्या वतीने विनोद कृष्ण गोसावी व धोंडी परब यांना कानाचे मशीन, अनिल कोकरे यांना अंध काठी, व दोन दिव्यांग व्यक्तींना वॉकिंग स्टिक देण्यात आली. संस्था कर्मचारी विशाखा कासले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास माणगाव गावचे सरपंच भोसले मॅडम, सावंत, रामदास मल्हार, माणगाव पोलीस अधीक्षक वाघाटे, पालयेकर, जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे तसेच संस्था कर्मचारी प्रणाली दळवी, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.