माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या मातोश्रींचे निधन
दोडामार्ग
दोडामार्ग शहरातील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व श्रीमती सुनिता दिनकर नानचे (वय ७६) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोवा येथील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अतिशय हळव्या, मनमिळाऊ आणि आदरयुक्त स्वभावामुळे त्या परिसरात सर्वांना परिचित होत्या. अनेक वर्षे त्यांनी दोडामार्ग बाजारपेठेत खानावळ व हॉटेल व्यवसाय प्रामाणिकपणे केला.त्यांच्या निधनाने दोडामार्ग शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्या दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे तसेच व्यापारी राजन नानचे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्थानिक सामाजिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोककळा पसरली आहे.

konkansamwad 
