अखेर मळेवाड - आजगाव तसेच शिरोडा बायपास- आरवली रस्त्याचे काम सुरू. आशिष सुभेदार व शिष्ट मंडळानी मानले कार्यकारी अभियंता यांचे आभार.

अखेर मळेवाड - आजगाव तसेच शिरोडा बायपास- आरवली रस्त्याचे काम सुरू.  आशिष सुभेदार व शिष्ट मंडळानी मानले कार्यकारी अभियंता यांचे आभार.

सावंतवाडी.

  मळेवाड शिरोडा तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून यां ठिकाणी प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब राजाराम उर्फ आबा चिपकर मनोज कांबळी प्रणित तळकर विशाल बर्डे यांनी भेट देत पाहणी केली.
  यां दोन्ही रस्त्या प्रश्न सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना माजी आमदार परशुराम उपरकर व शिष्टमंडळाने घेराव घातला होता. त्यानंतर मळेवाड शिरोडा रस्ता तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले प्रत्यक्ष त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब राजाराम उर्फ आबा चिपकर मनोज कांबळी प्रणित तळकर विशाल बर्डे यांनी जात पाहणी केली मागील काही दिवस सदर रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे व रस्त्याची दुर्दशा पाहता त्या ठिकाणावरून वाहने चालवताना अडथळा निर्माण होत असे सदरबाब लक्षात घेता माजी आमदार जी जी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती दर्शवून त्यांचा लक्ष वेधण्यात आला होता व त्याची तात्काळ दखल मळेवाड आजगाव रस्ता तसेच शिरोडा बायपास आरवली रस्त्याचे काम सुरू करण्यात याप्रसंगी यांचे युवा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार व शिष्ट मंडळ यांनी कार्यकारी अभियंता श्री केणी यांचे आभार मानले.