सातार्डा येथे बांबोळी रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सने घेतला पेट

सातार्डा येथे बांबोळी रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सने घेतला पेट

 

सातार्डा

 

 सातार्डा तिठा येथे दामोदर मांजरेकर यांच्या दुकानासमोर बांबोळी येथील अॅम्ब्युलन्सने (जीए ०७ ५८०९) अचानक पेट घेतला. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याने सदर अॅम्ब्युलन्स जळून खाक झाली. दरम्यान, पेडणे नगरपालिकेचे अग्निशम दल काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी शेकडो वाहने दोन्ही बाजूला अडकून पडली होती. पेडणे नगरपालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.