आनंदवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

वेंगुर्ला.
वेंगुर्ला आनंदवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.शाहू फुले आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला व धम्मदीप मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली व अॅड.सगुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लाडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमधील प्रथम क्रमांक प्राप्त भूमिका असणकर, द्वितीय क्रमांक खुशी मठकर, तृतीय क्रमांक सिमरन जाधव, उत्तेजनार्थ हमेश शेख, तर लहान गटात विनिता असणकर, द्वितीय रूची मठकर, तृतीय चैतन्या देसाई, उत्तेजनार्थ सोना जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे सदस्य गजानन जाधव, राजकुमार शिंगाडे, प्रमिला जाधव, तनवी असणकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली जाधव यांनी केले तर भारतीय संविधान प्रस्तावना वाचक मैत्रीली जाधव यांनी केले.