उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्या सिंधुदुर्गात

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्या सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग 


     उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वा. के.पी.एल. अश्वमेश २०२५ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा बॅ. नाथ पै शिक्षण संकुल, एम.आय.डी.सी., कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे होणार आहे. त्यानंतर रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथे ते राखीव राहतील. रात्री ८.५८ वा. कुडाळ रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रयाण करतील.