जिल्ह्यात २६ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट

जिल्ह्यात २६ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट

 

सिंधुदुर्गनगरी 

 

        जिल्ह्यात  २२ ते २६ मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी कळविले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी  दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे  यांनी केले आहे.