सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना 'उत्कृष्ट कार्यकर्ता' पुरस्कार मिळाल्याने मालवण येथे सत्कार

सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना 'उत्कृष्ट कार्यकर्ता' पुरस्कार  मिळाल्याने मालवण येथे सत्कार

 


मालवण


          सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना कोकण विभागाचा "उत्कृष्ट कार्यकर्ता" पुरस्कार मिळाल्याने मालवण येथील डॉ राहुल वालावलकर यांच्या संस्कार सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्, जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यशाळेत राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे संघटक विष्णुप्रसाद दळवी, सहसंघटक मोहिते, सहसंघटिका रीमा भोसले, सचिव  संदेश तुलसणकर, सहसचिव सुगंधा देवरुखकर, मालवण शाखेचे संघटक  नितिन वाळके, सहसंघटिका वफा खान, सचिव मालंडकर, महेश काळसेकर, रत्नाकर कोलंबकर, मालवण शाखेचे सर्व पदाधिकारी, कणकवली शाखेच्या अध्यक्षा श्रद्धा कदम, सचिव पूजा सावंत, विनायक पाताडे, सुभाष राणे, राजन भोसले, वैभववाडी शाखेचे अध्यक्ष तेजस साळुंके, जिल्हा सल्लागार समीर वंजारी, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग शाखेचे सर्व पदाधिकारी साधक, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग  इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती, सिंधुदुर्ग ग्राहक पंचायत उपाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.