दिलखुलास ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर डॉ.आरती रोजेकर यांची मुलाखत.
मुंबई.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. दैनंदिन जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा तसेच विशिष्ट आजार झाल्यावर काय काळजी घेणे आवश्यक आहे, ताणतणावाच्या परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोजेकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. रोजेकर यांची मुलाखत शनिवार दि. 23, सोमवार दि. 25 आणि मंगळवार दि.26 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 26 मार्च 2024 रोजी दुपारी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR