पालकमंत्री नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने कनेडीकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. कनेडी हायस्कूल, कनेडी या प्रशालेचा ७१ व्या वर्धापन दिन सोहळयास उपस्थिती, दुपारी ०२.०० वा. प्रहार भवन येथे पत्रकार परिषद, सायं. ०४.०० वा. मोटारीने गोव्याकडे प्रयाण, सायं. ०६.३० वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव, सायं. ७:०५ वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथून इंडिगोच्या विमानाने ६एफ - ५२४२ ने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ८:१५ वा. छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथे आगमन व राखीव अस त्यांचा नियोजित दौरा असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.