NH66 वरील धोकादायक स्थिती व अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मनसेची मागणी

NH66 वरील धोकादायक स्थिती व अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मनसेची मागणी

कणकवली   

 

      राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील सर्व्हिस रोड लगतच्या काही ठिकाणची नाली उघडी असून त्यावरचे स्लॅब तुटलेले/अर्धवट अवस्थेत आहेत. मोठा उघडा खड्डा तयार झाल्यामुळे दुचाकी व पादचारी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही सुरक्षा चिन्हे किंवा संरक्षण व्यवस्था नसल्यामुळे अपघात होण्याचा गंभीर धोका आहे.सर्व संबंधित ठिकाणांची तात्काळ पाहणी करून कामे पूर्ण करावीत, नाली व सर्व्हिस रोडची मजबूत व सुरक्षित दुरुस्ती करावी. कासार्डे पेट्रोल पंपाजवळील ब्रिजचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, सर्व ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना गार्डरेल, बॅरिकेड, सूचना फलक त्वरित लावण्यात याव्यात.अशा प्रकारच्या मागण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन.एच. 66 प्रकल्प कार्यालय, खारेपाटण, यांच्याकडे मनसे कणकवली यांच्या कडुन करण्यात आल्या यावेळी मनसेचे उपसचिव अनंत आचरेकर तालुका अध्यक्ष शांताराम सादये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, ता. अध्यक्ष समिर तेली, उपतालुका अध्यक्ष अतुल दळवी, सुनील सोनार, देवेंद्र जाधव पदाधिकारी उपस्थित होते.