मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; पुढील चार दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता.

मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; पुढील चार दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता.

पुणे.

   राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबई आणि कोकणातील रहिवाशांची अद्याप उकाड्यातून सुटका नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
     राज्यात गेल्या काही आठवड्यापासून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत उष्णतेने कहर केला. बहूतेक भागात दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.        
याशिवाय, लातूर आणि हिंगोली येथेही अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील.मात्र, मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच १० मे २०२४ पासून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह वादळीवारा आणि वीज गर्जनेची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.