कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम यांची निवड.

कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम यांची निवड.

वेंगुर्ला.

   कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम तर उपाध्यक्षपदी रमेश परब यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
    कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो.गेली २४ वर्षे हे मंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन करत असून यावर्षीच्या उत्सवासाठी मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. 
 यामध्ये खजिनदारपदी सुशील परब, सहखजिनदारपदी देविदास वालावलकर, सचिवपदी नेल्सन मोंतेरो, सहसचिवपदी विलास परब, सल्लागार पदी अॅड. शाम गोडकर, डॉ.अनिल वनकुद्रे यांची निवड करण्यात आली.यावेळी आनंद शिरोडकर, महेश टेमकर, मनीष रेवणकर, निलेश वराडकर, सिल्वान डिसोजा, गुणाजी परब, नारायण फटजी, विल्सन डिसोझा, श्याम वालावलकर यांच्यासह ४५ सदस्य उपस्थित होते.
   १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणा-या या नवरात्र उत्सवात १५ रोजी नवदुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना त्यानंतर उत्सव कालावधीत भजन, दांडिया, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा स्पर्धा, आर्केस्ट्रा, जादूगार यासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.