एस.एस.पी.एम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे आय ट्रिपल ई आणि आय एस ए अंतर्गत ‘विविध योजना आणि संधी’ विषयवार सेमिनार संपन्न.

कणकवली.
संगणक अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग विभागातर्फे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी “आय ट्रिपल ई आणि आय एस ए द्वारे प्राध्यापकांसाठी ऑफर केलेल्या विविध योजना आणि संधी” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. सेमिनारची सुरुवात विभाग प्रमुख प्रा.सौ.नलावडे एस.एस. यांच्या परिचय व स्वागत भाषणाने झाली.या कार्यक्रमासाठी प्रा.दत्तात्रय एस.सावंत हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.प्रा.दत्तात्रय.एस.सावंत हे सहाय्यक प्राध्यापक, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग, मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, एनएमआयएमएस विद्यापीठ मध्ये कार्यरत असून, ते जिल्हा अध्यक्ष इलेक्ट, आय यस ए एशिया पॅसिफिक जिल्हा आणि डायरेक्टर इलेक्ट, एज्युकेशन अँड रिसर्च डिव्हिजन आय एस ए, यु एस ए म्हणूनही कार्यरत आहेत.
प्रा.सावंत यांनी विद्यार्थी कल्याणासाठी आय ट्रिपल इ आणि आय एस ए अंतर्गत विविध योजनांसह विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी संशोधनाच्या संधींची माहिती दिली. तसेच त्यांनी इतर संस्थेची उदाहरणे, विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि संस्थेचे फायदे देखील स्पष्ट केले. शेवटी त्यांनी प्राध्यापकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
या व्याख्यानाला संवादासह चांगला प्रतिसाद मिळाला.विभाग प्रमुख प्रा.म्हापसेकर डी.पी. यांच्या आभार प्रदर्शनाने सत्राची सांगता झाली. सर्व प्राध्यापकांना या योजनांची माहिती व जाणीव करून देण्यासाठी वेळ काढल्याबद्दल प्रा.दत्तात्रय.एस.सावंत यांचे आभार व्यक्त केले.