वेंगुर्ला येथील अमृता कॅश्यू इंडस्ट्रीजचा महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराने गौरव.

वेंगुर्ला.
महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार पुणे- वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात कोकण क्षेत्र उद्योग विभाग मधुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमृता काजू इंडस्ट्रीज वेंगुर्ला यांना सन २०१८-१९ च्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार अंतर्गत कृषी उत्पादन क्षेत्रातून सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ,अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते. अमृता कॅश्यू इंडस्ट्रीजचे संचालक सिद्धार्थ सुरेश प्रभू-झांटये यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला अमृता कॅशुच्या अजित पालव, पूनम जाधव, सुधीर गावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी व कर्मचारी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.