वेताळ प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सदू स्पोर्ट्स अकॅडमी वजराटचे उल्लेखनीय यश.

वेताळ प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सदू स्पोर्ट्स अकॅडमी वजराटचे उल्लेखनीय यश.

वेंगुर्ला.

  वेताळ प्रतिष्ठान तुळस सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धामध्ये सदू स्पोर्ट्स अकॅडमी वजराटने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.यामध्ये इयत्ता नववी, दहावी मोठा गट ५ कीमी. यश महेश राणे प्रथम क्रमांक, श्रीधर चंद्रकांत गावडे दुसरा क्रमांक, इयत्ता सातवी आठवी गट ३ किमी
चिन्मय महेश राणे प्रथम क्रमांक, चैतन्य महेश राणे दुसरा क्रमांक, अथर्व संतोष राणे तिसरा क्रमांक, इयत्ता तिसरी चौथी मुली युक्ता सतीश राणे प्रथम क्रमांक.
   या विजेते स्पर्धकांना सदू स्पोर्ट्स पिंपळगाव चे प्रशिक्षक संतोष राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूचे अभिनंदन श्री सचिन परुळकर वेताळ प्रतिष्ठान अध्यक्ष यांनी केले. तसेच श्री गिरेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.