वेंगुर्ल्यातील भव्य समई नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.....कालिका समई नृत्य ग्रुप, डिगस प्रथम
वेंगुर्ला
शिवप्रेमी मित्र मंडळ, माणिक चौक, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य समई नृत्य स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. वेंगुर्ल्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध समई नृत्य ग्रुपनी आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत कालिका समई नृत्य ग्रुप, डिगस, कुडाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर गवळदेव समई नृत्य ग्रुप, बोर्डवे, कणकवली यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक देवी सातेरी समई नृत्य ग्रुप, मठ, वेंगुर्ला यांनी पटकावला. उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार संत लालाजी मठ, टाकयेवाडी, वेंगुर्ला यांना मिळाला तर विशेष समई नृत्यासाठी जि. प. शाळा, परबवाडा १ यांचा गौरव करण्यात आला. शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन संस्कार भारती रांगोळी स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मेघना राऊळ यांनी प्रथम क्रमांक, अपर्णिता वेंगुर्लेकर यांनी द्वितीय क्रमांक तर तृणाली माळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. समई नृत्य स्पर्धेसाठी हर्षु बागायतकर आणि मयुरी माडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर रांगोळी स्पर्धेसाठी श्रुती दाभोलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वरेया फाउंडेशन, नगराध्यक्ष दिलीपजी गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेविका सुषमा खानोलकर, नगरसेविका लीना म्हापणकर, नगरसेविका काजल कुबल, नगरसेविका मयुरी केरकर, भूषण आंगचेकर, आनंद रेडकर, प्रसाद गुरव, हर्षद रेडकर, स्वप्नील पालकर, बंड्या तुळसुळकर, दर्शन तानवडे, ज्ञानेश्वर रेडकर, किशोर पोतदार, भाऊ मालवणकर, अमर दाभोलकर, शैलेश परुळेकर, उदय मालवणकर, हेमत गावडे, सुमन कामत, साक्षी चमणकर, वैभव फटजी तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन्ही स्पर्धांना प्रेक्षकांचा आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, प्रायोजक, कलाकार, परीक्षक, कार्यकर्ते आणि रसिक प्रेक्षक यांचे शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माणिक चौकातील सर्व रहिवासी आणि शिवप्रेमी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांचे विशेष योगदान लाभले. मंडळाचे अध्यक्ष नितिश कुडतरकर, उपाध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, खजिनदार प्रथमेश यंदे आणि कार्याध्यक्ष विनय गोगटे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
konkansamwad 
