राज्यात पारपोलीची ओळख फुलपाखरांचे गाव म्हणून झाली पाहिजे : मंत्री दीपक केसरकर.

राज्यात पारपोलीची ओळख फुलपाखरांचे गाव म्हणून झाली पाहिजे : मंत्री दीपक केसरकर.

सावंतवाडी.

  राज्यात पारपोलीची ओळख फुलपाखरांचे गाव म्हणून झाली पाहिजे यासाठी फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करूया, अशी साद शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, अभिनेता दिगंबर नाईक, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, संदेश गुरव, गौरेश तेजम, ऋतुजा परब, प्रियांका गुरव, प्रमोद परब, गजानन टेकर, एकनाथ परब, दादा देसाई, रामदास मेस्त्री आदी उपस्थित होते.
   यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी फुलपाखरू महोत्सव आढावा घेतला. या महोत्सवात जंगल सफारी, फुलपाखरू ओळख, निसर्ग सौंदर्य ओळख करून महोत्सवाचे महत्त्व जगभरात नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या ठिकाणी असलेल्या फुलपाखरूच्या प्रजाती सर्वांना कळणे गरजेचे आहे. सिंधुरत्न योजना संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली आणि वनविभागाच्या विद्यमाने २० ते २३ ऑक्टोबर ला पारपोली येथे फुलपाखरू महोत्सव आयोजि करण्यात आला आहे.
      केसरकर म्हणाले, फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास पारपोली परिसरात आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन निवास, भोजन व निवास न्याहारी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. याठिकाणी एकाच वेळी किमान ८० पर्यटक नैसर्गिक भ्रमंती करू शकतात. सकाळी प्रशिक्षण दिले जाईल. फुलपाखरू महत्त्व, प्रजाती ओळख करून दिली जाणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून फुलपाखरू पाहणं आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळता येईल. केसरकर म्हणाले, पारपोली येथील फुलपाखरू न्याहाळत आंबोली पर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. ही पायवाट संस्थान काळापासून पायवाट आहे. तिचा उपयोग करून घेतला जाईल. पारपोली फुलपाखरू महोत्सवामुळे शिरशिंगे, आंबोली परिसरात आर्थिक दृष्ट्या प्रगती निर्माण झाली पाहिजे.