दाभोली इंग्लिश स्कूल येथे 'आमची शाळा बचत शाळा' उपक्रम संपन्न.

दाभोली इंग्लिश स्कूल येथे 'आमची शाळा बचत शाळा' उपक्रम संपन्न.

वेंगुर्ला.

    गणेश चतुर्थीनिमित्त दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली तंत्र शिक्षण विभाग हाताला काम श्रमाला दाम  ब्रीद घेउन कोज टू  कनेक्ट  फाऊंडेशन वतीने वेंगुर्ला व दाभोली  या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी बनवीलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. याला  पालक, ग्रामस्थ, मान्यवर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू  भांडवल, उत्पादन प्रक्रिया, मार्केटिंग, इत्यादी बाबत प्रत्यक्ष अनुभव घेता आला. यातुन मिळालेला नफा व बचत याची शालेय विद्यार्थ्यांना महत्व व बचत सवय लागावी यासाठी खास दिपावली निमीत्त कै.वामन सदाशिव प्रभूखनोलकर स्मृती खनोलकर परिवार दाभोली यांच्या वतीने शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना बचत पेटी (पिग बैंक) वाटप करण्यात आले यासाठी ॲड. सुहास प्रभुखनोलकर यांचे सहकार्य लाभले.
    यावेळी प्रमुख पाहुणे सरस्वत बैंकचे शाखा व्यवस्थापक सतिश वालवे, तुकाराम सामंत, केतन प्रभूखनोलकर, सुधिर गोलतकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम प्रभूखनोलकर, उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, मुख्यद्यापक किशोर सोन्सुरकर, वसंत पवार, श्री दिपक पटिल, सौ रेशमा चोडणकर आदि मान्यवर उप्स्तीत होते.
   सरस्वत बैंकचे व्यवस्थापक श्री.वालवे यांनी बचतीचे महत्व व ती कशी करावी याबाबत मार्गदशन केले. श्री केतन खनोलकर यांनी माजी बचत शाळा या उपक्रमचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दाभोली हायस्कूल मधे आयोजित विविध शालेय उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.आपण सर्वांनी एकत्र येउन भविष्यात शाळा विकासबाबत माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, दाते सर्वांनी मिळुन प्रयत्न करुया असे आवाहन केले.
   मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांनी बचत ही काळाची गरज आहे. अनावश्यक तसेच शरीरास अपयकारक खाऊ वर खर्च न करता तेच पैसे बचत करावी व आपल्या पुढिल शैक्षणिक गरजा पुर्ण करण्यासाठी पालकांना सहकार्य करावे असे सांगितले.
   लवकरच बचत पेटीमध्ये साठवलेल्या पैशातून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तीक बैंक खाती काढली जातील  असे सांगितले. तसेच प्रत्येक्ष बैंक कामकाज याबाबत क्षेत्र भेट आयोजित केली जाईल असे सांगितले.या कार्यक्रमाचे आभार रेशमा चोडणकर यांनी मानले.