सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपामधूनच निवडणूक लढवतील.....आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा
मुंबई
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय हालचालीबाबत मोठा दावा करीत राज्यात नवीन चर्चेचा विषय निर्माण केला.सध्या सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपामधूनच निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.“काहीही झाले तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपामधूनच लढणार आहेत. त्यांच्यासोबत २२ आमदारांचेही ठरलेले आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांचेही जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता मोघम बोलून चालणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक झाली, तर ते निवडून येणार नाहीत. शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल, असा दावा त्यांनी केला.
konkansamwad 
