वेंगुर्ला पोलिसांकडून तात्काळ समस्येचे निवारण, ज्येष्ठ नागरिकाने पोलीस अधीक्षकांना भेटून व्यक्त केले समाधान

वेंगुर्ला पोलिसांकडून तात्काळ समस्येचे निवारण,  ज्येष्ठ नागरिकाने पोलीस अधीक्षकांना भेटून व्यक्त केले समाधान


सिंधुदुर्ग


         सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेवून त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे सर्वच पोलीस अधिकारी यांना आदेशित करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ नागरिक एकनाथ काशिराम चुडजी, (वय 75 रा. तुळस), यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप भोसले व महिला पोलीस अंमलदार रंजिता चौहान यांनी तात्काळ दखल घेवून त्यांच्या समस्येचे निराकरण केले म्हणून चुडजी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेतली व सिंधुदुर्ग पोलीसांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करुन आभार व्यक्त केले. सदर कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक यांनी संदीप भोसले व रंजिता चौहान यांचे कौतुक केले तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 7036606060 यावर संपर्क साधावा तसेच आपत्कालीन हेल्पलाईन 112, कोस्टल हेल्पलाईन 1093, सायबर क्राईम हेल्पलाईन 1930, पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग व्हॉटस्अप नं. 8275776213 यावर देखील पोलीस मदतीची सुविधा उपलब्ध आहे.