हुमरमळा गावातील महीला बचत गटांची चळवळ म्हणजे महिला स्वावलंबी होण्याचे आदर्श काम.......जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे गौरवोद्गार

हुमरमळा गावातील महीला बचत गटांची चळवळ म्हणजे महिला स्वावलंबी होण्याचे आदर्श काम.......जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे गौरवोद्गार

 

सिंधुदुर्गनगरी

 

         अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने हुमरमळा वालावल गावातील महीलांनी बचत गटांची चळवळ उभारुन एक प्रकारे क्रांतीच केली आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अशा कार्यतत्पर बचत गटांना कायमच सहकार्य लाभेल असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. हुमरमळा वालावल गावच्या माजी सरपंच अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने अध्यक्ष मनीष दळवी यांचा गावातील महीला बचत गटांच्यावतीने शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलताना दळवी म्हणाले जिल्हा बँक ही महीला बचत गटांच्या उन्नतीसाठी कायम काम करत आली आहे परंतु हुमरमळा वालावल गावातील अर्चना बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांची चळवळ मोठी उभी राहुन प्रत्येक महिला काहीनाकाही छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतलेली दिसत आहे अशाच स्वरुपात जिल्ह्यातील महीला बचत गटांचे काम सुरू असुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायमच त्यांच्या पाठीशी असल्याचे दळवी यांनी सांगितले यावेळी ते पुढे म्हणाले जिल्हा बँकेची प्रगतीकडे वाटचाल ही सर्व संचालक, उपाध्यक्ष, कर्मचारी व ग्राहक यांच्या सर्वांच्या सहकार्यातुन सुरु असुन बँकेला मिळालेले पुरस्कार हे निमित्त असुन यात जिल्हावासियांचे सहकार्य आहे असे सांगुन खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घौडदौड सुरू असल्याचे विशेष उल्लेख केला. यावेळी अतुल बंगे, अॅड रीना राजेश पडते, अर्चना बंगे उपस्थित होते.