२६ एप्रिल रोजी मालवण येथील मसदे वडाचापाट येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी होणार

मालवण
श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास, रजि कुडाळ माडयाची वाडी संलग्न असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण या मठामध्ये दर वर्षाप्रमाणे याहीवर्षी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त कार्यक्रम सकाळी ७ वा. स्वामी, पादुका अभिषेक, सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची षोडशोपचार पूजा अर्चा. सकाळी ८:३० वा. होम - हवन, सकाळी १०:३० वा. पालखी मिरवणूक सोहळा, दुपारी ११:३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पु. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी १२:३०वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण, दुपारी १:०० वा. अन्नदान-महाप्रसाद, सायंकाळी ६:३० वा. श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप, बुवा ओंकार येरम यांचे सुस्वर भजन, रात्रौ ठिक ९ वा. काका गोसावी प्रस्तुत ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा "श्री साई समर्थ' नाट्य प्रयोग सादर होणार आहे तरी स्वामी भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.