जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न.

जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न.

सिंधुदुर्ग.

   आगामी सण, उत्सव शांततेत पार पडावेत, उत्सवांदरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सर्व धर्मियांमध्ये सलोख्याचे संबंध रहावे, कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततेत पार पडावी या दृष्टीने पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात येथे पार पडली.
  या बैठकीमध्ये आगामी होणारे सण, उत्सव हे शांततेत पार पडावेत, कोठेही अनुचित प्रकार घडू नयेत, सर्व धर्मियांमध्ये सलोख्याचे संबंध राहून चांगले वातारवण रहावे आणि सर्व सण-उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडावेत, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 शांततेत पार पडावी यादृष्टीने सदस्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.
   या बैठकीस कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, जिल्हा विशेष शाखा यांचेसह जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.