शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा  स्मृतिदिन साजरा

शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा  स्मृतिदिन साजरा

शिरवल


           
          स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते विजय नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी आमदार वैभव नाईक, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीयांनी अभिवादन केले. स्मृतिदिनानिमित्त शिरवल येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नंदिनी नाईक, सचिन आचरेकर, युवक कल्याण संघाचे सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार प्रा. मंदार सावंत, उप प्राचार्य डॉ. अमोल उबाळे, प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. मेघा बाणे, अदिती सावंत, प्रा.नमिता सागवेकर,नितीन राऊळ,अरुण परब आदि उपस्थित होते.