सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम.....सरासरी ३८.५ मिमी पावसाची नोंद

सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम.....सरासरी ३८.५ मिमी पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी

 

      जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सरासरी ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता दोडामार्ग तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १११ मिमी मुसळधार पाऊस झाला आहे, तर मालवण तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.यामध्ये वैभववाडी तालुक्यात ५१ मिमी आणि सावंतवाडी तालुक्यात ५० मिमी पाऊस झाला असून या दोन्ही भागात पावसाचा जोर अधिक दिसून आला.त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ३८ मिमी आणि वेंगुर्ला तालुक्यात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यात १६ मिमी तर देवगड तालुक्यात अवघा ६ मिमी पाऊस पडला आहे.सध्या जिल्ह्यातील काही भागांत मध्यम तर काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, दोडामार्गमधील विक्रमी पावसामुळे तेथील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.