कणकवलीत २४ मार्च रोजी भव्य कृषी महोत्सव....आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा मेळा
कणकवली
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे कणकवली येथे मंगळवार, दिनांक 24 मार्च रोजी “कृषी महोत्सव 2026” चे भव्यआयोजन करण्यात आले आहे. कणकवली कॉलेजच्या सभागृह व परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे.या महोत्सवात कृषी प्रदर्शनासह मार्गदर्शन सत्रे आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, नव्या पिकपद्धती आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. श्री. नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.महोत्सवात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, महिला बचत गटांची उत्पादने, शासकीय योजनांचे स्टॉल, शेतकरी सन्मान सोहळा, शेती अवजारे व आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार आहे. तसेच तृणधान्ये, फळपिके आणि भाजीपाल्याचे आकर्षक प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे.या निमित्ताने प्रगतशील शेतकरी श्री. अनिल दत्तात्रय देसाई हे ‘ड्रॅगन फ्रूट व मशरूम लागवड’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री. सिद्धी उत्तम वारंग ‘सेंद्रिय शेती’, श्री. प्रसाद राज थोरात ‘पौष्टिक तृणधान्ये’, श्री. संतोष वारखणकर ‘पॅकेजिंग व्यवस्थापन’ आणि श्री. हेमंत जगन्नाथ गावडे ‘मार्केटिंग व बेकरी व्यवस्थापन’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उमाकांत पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. प्रवीण ओहोळ यांनी केले आहे.
konkansamwad 
