जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीची १६ जून रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, 2016 मधील कलम 23 अन्वये दिव्यांग व्यक्तींच्या जिल्हास्तरावरील तक्रारीबाबत तक्रार निवारण समितीची सभा सोमवार दि. 16 जून रोजी दुपारी 4 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव किशोर काळे यांनी दिली आहे.