वेंगुर्लेत बॅ. नाथ पै अनुयायींचा सत्कार, ‘काकासाहेब चमणकर’ चरित्र पुस्तकाचे प्रकाशन
वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटतर्फे आयोजित बॅ. नाथ पै अनुयायींचा सत्कार समारंभ आणि प्रो. डॉ. सुनील भिसे लिखित ‘अग्रणी शेतकरी आमदार काकासाहेब चमणकर’ या चरित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना वक्त्यांनी नाथ पै आणि काकासाहेब चमणकर यांच्या समाजवादी कार्याचा गौरव केला. बॅ. नाथ पै फाउंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सत्कार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, ॲड. देवदत्त परुळेकर, उमेश गाळवणकर, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, पंचायत समिती सभापती शंकर घारे, सचिन वालावलकर, संजय गावडे, योगिता परब, रुपेश राऊळ, नीलेश चमणकर, लेखक प्रो. डॉ. सुनील भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज, बॅरिस्टर नाथ पै आणि कृषीरत्न काकासाहेब चमणकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागतपर भाषणात जयप्रकाश चमणकर म्हणाले की, नाथांच्या विचारांचा पगडा आजही समाजमनावर असून वेंगुर्ले ही त्यांची जन्मभूमी आहे. पुरुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या श्रावणी आरावंदेकर आणि अनुष्का मसुरकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला.‘अग्रणी शेतकरी आमदार काकासाहेब चमणकर’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. लेखक डॉ. सुनील भिसे यांनी काकासाहेबांना गोरगरीब शेतकऱ्यांचे खरे आमदार म्हणून गौरवले. उमेश गाळवणकर, दिलीप गिरप आणि अॅड. देवदत्त परुळेकर यांनीही नाथ पै यांच्या विचारसरणीवर भाष्य केले.कार्यक्रमाच्या अखेरीस वेंगुर्ले तालुक्यातील ४० नाथ पै अनुयायींचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले तर आभार चंद्रकांत म्हापणकर यांनी मानले.
konkansamwad 
