सावंतवाडी येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे आयोजन.

सावंतवाडी येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

  शासनाच्या वतीने दिनांक १ ते १४ ऑगस्ट २०२४ या दरम्यान साजरा होणाऱ्या महसुल पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत दि. ५ ऑगस्ट २०२४ राजी जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्यावतीने जिल्ह्यातील वीरनारी, वीर माता, वीर पिता यांनी सरकारी जमीन वाटप तसेच माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या महसूल विभागासंबंधीत व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच माजी सैनिकांनी मागणी केलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्याकरीता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे "सैनिक हो तुमच्यासाठी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   या कार्मक्रमात माजी सैनिकांच्या प्रलंबित समस्याबाबत विशेषत: महसूल विभागाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात सविस्तर विचार विनीयम करण्यात येणार आहे. तसेच शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांना शासनाकडून लागू असलेल्या ०५ एकर सरकारी जमीनबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.
   तरी जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे अशा सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांच्या महसूल विभागासंदर्भातील समस्या व इतर प्रकरणांचा लेखी अर्ज व सर्व कागदापत्रासह व त्याबाबत यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता तहसिलदार कार्यालय , सावंतवाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३६२ २२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.