कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची विशेष सभा संपन्न.

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची विशेष सभा संपन्न.

कुडाळ.

  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची विशेष सभा लेमन ग्रास हाॅटेल कुडाळ येथे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.मतदार नोंदणी,बुथ कमिटी, मंडल कमिटी, बी.एल.ए.संदर्भात आढावा घेण्यात आला.जिल्हा कमिटीची पुनर्रचना करण्यात येणार असून पक्षासाठी वेळ देऊ न शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वगळून नवीन कार्यकर्त्यांना जिल्हा कमिटीत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान आठही तालुक्याच्या बैठका घेण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी निरिक्षक नियुक्त करण्यात आले. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असून काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले. या सभेला माजी अध्यक्ष विकासभाई सावंत तसेच प्रभारी अजिंक्य देसाई यांनी मार्गदर्शन केले.
   यावेळी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर,अ‍ॅड. दिलीप नार्वेकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अनिल डेगवेकर, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, मिडिया सेल जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे,सामाजिक न्याय जिल्हा प्रमुख अजिंक्य देसाई, शिक्षक सेल जिल्हा प्रमुख बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, उद्योग सेल जिल्हा प्रमुख तुषार भाबल, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सुभाष दळवी,रवींद्र म्हापसेकर,आफ्रिन करोल,विभावरी सुकी,सोनल सावंत,माया चिटणीस, सुमेधा सावंत, कृतिका कुबल, दिक्षा पालव,अमोल सावंत, जस्मीन लक्शमेश्वर, अमिदी मेस्त्री, रावजी परब, आसावरी गावडे, लक्ष्मीकांत परुळेकर, जेम्स फर्नांडिस, लुईस मेंडीस, संजय लाड, कृष्णा धाऊसकर, शिवा गावडे, सुधीर मल्हार, सुभाष नाईक, आनंद कुंभार, संदेश कोयंडे,तौसीफ शेख, तबरेज शेख, संकेत वेंगुर्लेकर, विनायक मेस्त्री,महेंद्र मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.