कणकवली येथे जागतिक ग्राहक दिन साजरा.
कणकवली.
येथील पेन्शनर भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दादा कुडतरकर हे उपस्थित होते.जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व,ग्राहक संरक्षण कायदा 1986,त्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार,ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने होणारी फसवणूक,त्यावर तक्रार कशी व कुठे करावी, ऑनलाईन फसवणूक होऊ नये याबद्दल काय दक्षता घ्यावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक दादा कुडतरकर,तालुका अध्यक्ष श्रद्धा कदम,तालुका सचिव पुजा सावंत यांनी केले.यावेळी उपस्थित सेवानिवृत्त वेतनधारकांनी काही प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच ग्राहक पंचायत ही चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.सदर कार्यक्रमाला सेवानिवृत्त वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष तथा ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक दादा कुडतरकर,सेवानिवृत्त वेतनधारक संघटनेचे सचिव व्ही.के.चव्हाण व सेवानिवृत्त वेतनधारक,ग्राहक पंचायतच्या कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा कदम,सचिव पुजा सावंत,सदस्य माणगावकर हे उपस्थिती होते.