एलपीजी सिलेंडरच्या त्रासातून होणार सुटका; हॉटेलसह व्यावसायिक ग्राहकांसाठी 'पीएनजी' जोडणीचा पर्याय

 एलपीजी सिलेंडरच्या त्रासातून होणार सुटका; हॉटेलसह व्यावसायिक ग्राहकांसाठी 'पीएनजी' जोडणीचा पर्याय

 

सिंधुदुर्गनगरी

 

   जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना आता पीएनजी म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस जोडणी मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे आवश्यक झाले आहे. तशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत त्यामुळे एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या व्यवसायाचे पुनर्जीवन होण्यास मदत होणार आहे. या नव्या नियमानुसार, ज्या व्यावसायिकांना व्यावसायिक एलपीजीच्या ५० टक्के वाटपाचा लाभघ्यायचा आहे, त्यांना जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन संस्थेकडे पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर होणार आहे. ज्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी गॅसची आवश्यकता आहे, त्यांनी तातडीने अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी महाराष्ट्रछ नॅचरल गॅस लिमिटेड च्या कुडाळ येथील सांगिर्डेवाडी, नक्षत्र नगरी समोरील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक ग्राहक अधिक माहितीसाठी ७५८८०९०५०५ किंवा ९८९०७४३५४७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा crmsindhudurg@mngl.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात. तरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.