जामसंडेतून 'कट्टा' नवीन महसुली गाव निर्मितीचा प्रस्ताव
सिंधुदुर्ग
प्रशासकीय कामाचा निपटारा जलद गतीने व्हावा आणि नागरिकांची सोय व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देवगड तालुक्यातील 'जामसंडे' या मोठ्या महसुली गावाचे विभाजन करून 'कट्टा' हे नवीन महसुली गाव प्रारूप अधिसूचनेद्वारे निर्माण केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलमांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.मूळ गावामध्ये आता एकूण ४८५ भूमापन क्रमांक राहतील. यामध्ये सर्वे नंबर १ ते ५६, ५८, ५९, ६६ ते १११, १५५ ते ५१६, ५१८ ते ५२७, ५३०, ५३१ आणि ५३३ ते ५३९ चा समावेश असेल.जामसंडे गावातून एकूण ५४ भूमापन क्रमांक वेगळे करून हे नवीन गाव अस्तित्वात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वे नंबर ५७, ६० ते ६५, ११२ ते १५४, ५१७, ५२८, ५२९ आणि ५३२ चा समावेश असेल.या प्रारूप अधिसूचनेमुळे ज्या नागरिकांवर किंवा हितसंबंधितांवर परिणाम होणार आहे, त्यांना त्यांच्या हरकती अथवा सूचना नोंदवण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या लेखी हरकती व सूचना ०३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तहसीलदार देवगड किंवा उपविभागीय अधिकारी कणकवली यांच्या कार्यालयात सादर कराव्यात. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.
konkansamwad 
