खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार - संजू परब

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार - संजू परब

 

सावंतवाडी

    माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याची सविस्तर माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.या अमृत महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळवाटप, गरजूंना धान्य वाटप आणि वृक्षारोपण असे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच अनाथाश्रमांना मदतीचा हात देऊन हा वाढदिवस खऱ्या अर्थाने लोकोपयोगी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.महिला आघाडीच्या वतीनेही या सोहळ्यासाठी विशेष जय्यत तयारी करण्यात आली आहे. महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले की, महिला आणि लहान मुलांसाठी वेशभूषा, प्रश्नमंजुषा आणि पाककला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि पत्रकार भगिनींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिला कीर्तनकारांच्या कार्यक्रमातून अध्यात्मिक वारसाही जपला जाणार आहे. या संपूर्ण नियोजनावेळी संजू परब, निता सावंत-कविटकर आणि परीक्षित मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.