सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी महेश सारंग यांच्याकडून मदत.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमाला २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंग यांनी प्रतिष्ठानच्या निस्वार्थ सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले असून ही मदत सुपूर्द केली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सध्या समाजातील विविध स्तरातून आणि दात्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही रुग्णवाहिका लवकरच सेवेत दाखल होणार असून, गरीब रुग्ण आणि अपघातग्रस्तांसाठी ती मोठा आधार ठरेल. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका २४ तास सेवा देण्यासाठी सज्ज असेल आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या कामासाठी नेहमीच तत्पर राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

konkansamwad 
