इनरव्हील क्लब वेंगुर्लेच्या गौरव पेडणेकर यांच्या उपचारासाठी मदतीचा हात
वेंगुर्ला
किडनीच्या गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या आरवली येथील गौरव सुभाष पेडणेकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी इनरव्हील क्लब, वेंगुर्ला यांच्या वतीने ₹१५,००० ची आर्थिक मदत देण्यात आली.इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, उपाध्यक्षा सौ. सई चव्हाण, खजिनदार सौ. वृंदा गवंडळकर तसेच सदस्य सौ. आकांक्षा परब, सौ. रसिका मठकर आणि डॉ. सौ. पूजा कर्पे यांनी पेडणेकर कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीची रक्कम सुपूर्द केली. यावेळी गौरव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आरवलीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तातोबा कुडव, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, सौ. श्रेया पेडणेकर, वृषाली पेडणेकर, विशाल पेडणेकर, सौ. सुहासिनी पेडणेकर तसेच सुभाष पेडणेकर उपस्थित होते.इनरव्हील क्लब वेंगुर्लाने सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णाला दिलेला हा मदतीचा हात कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.दरम्यान, गौरव सुभाष पेडणेकर यांच्यावर लवकरच मुंबई येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतरच्या उपचारांसाठीही मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि समाजबांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदत करून पेडणेकर कुटुंबाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
konkansamwad 
