कसाल येथे १३ मार्चला रोंबाट व राधानृत्य स्पर्धा

कसाल येथे १३ मार्चला रोंबाट व राधानृत्य स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी

 

    शिमगोत्सवानिमित्त कसाल येथे शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी रोंबाट व राधानृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीसांची खैरात करण्यात आली असून जिल्ह्यातील ठीक ठिकाणचे प्रसिद्ध स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यामुळे रोंबाट व राधानृत्य कार्यक्रम रसिकां साठी मोठी पर्वणी ठरणार आहे.कोकणातील शिमगोत्सवात रोंबाट व राधानृत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक लोककला जपली जाते या लोककलेला लोकाश्रय मिळावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या रोंबाट स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 50 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकास 25 हजार रुपयाचे रोख बक्षीस तसेच राधानृत्य स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10 हजार, 5 हजार, 3 हजार रुपये अशी बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे. कसाल येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि पावणाई रवळनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 11 या वेळेत कसाल बाजारापेठ येथे रोंबाट व राधानृत्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील स्पर्धकांनी 8329487536 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळा मार्फत करण्यात आले आहे. आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोंबाट व राधानृत्य पाहण्याचा आनंद घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.