नेरूर येथे १ जानेवारी रोजी करियर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

नेरूर येथे १ जानेवारी रोजी करियर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

कुडाळ.

   तालुक्यातील नेरूर ग्रामपंचायत ( बाबी कलिंगण सभागृह ) येथे सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते १२:३० या वेळेत नोकरी व्यवसाय या विषयावर विनामुल्य मार्गदर्शन ( वर्ग ) आयोजित केला आहे.ज्योतिषी श्री. महादेव कांबळी हे सर्वांना नोकरी व्यवसाय या विषयावर विनामुल्य मार्गदर्शन करणार आहेत. तरी नेरूर गावातील नागरिकांनी या विनामुल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजक सर्वेश देसाई यांनी केले आहे.