शिक्षकांच्या मार्च एप्रिलच्या वेतनाचा मार्ग मोकळा

शिक्षकांच्या मार्च एप्रिलच्या वेतनाचा मार्ग मोकळा

मुंबई

 


        संच मान्यता शालार्थ ला जोडल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची  पदे मिस मॅच होत होती. या कारणास्तव गेले चार ते पाच महिने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाना वेतन करताना असंख्य अडचणी येत होत्या.पगार बिल फॉरवर्ड केल्यावर ते वेतन अधीक्षक लॉगिन ला न जाता,उपसंचालक (कोल्हापूर) लॉगिन ला जात होते. कोल्हापूर उपसंचालक कार्यालयातून बिले अप्रू केल्यावर मुख्याध्यापक लॉगिन ला येत असत.व पुन्हा वेतन अधीक्षक लॉगिन ला फॉरवर्ड केलतावर पगार होत असत.कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात तेच तेच कागद आणि त्याचं त्याचं शिफारशी मागवून शिक्षकांना खेटे मारावे लागत होते.नेहमी प्रमाणे मार्च एप्रिल ची बिले ब्रोकन् पद्धतीने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयानी फॉरवर्ड केल्यावर उपसंचालक लॉगिन ला गेली.हो बिले उपसंचालक लॉगिन ला गेल्यावर १० दिवस याकडे उपसंचालक कार्यालयाकडून काहीच दखल घेण्यात आली नव्हती. शिक्षकांनी चौकशी साठी गेल्यावर त्याचं त्याचं कागद पत्रांची पूर्तता करा अस सांगण्यात येत होत.या साऱ्या गोष्टीची कोकण विभागीय  शिक्षक आमदार यांनी पाठवपुरावा करून गेले दोन महिने पगार न झालेल्या शिक्षकांची बिले तात्काळ मंजूर करा अशी मागणी उपसंचालिका प्रभावती कोळेकर यांचे कडे केली.खर तर मिस मॅच होणारी पदे अनिनपगार घेणारे शिक्षक यांचा थेट संबंध नसल्याने विनाकारण शिक्षकांना वेठीस धरू नका असे आमदार ज्ञानेश्वर् म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.वारंवार उपसंचालक स्तरावर जाणाऱ्या पगार बिलांविषयी कायमस्वरूपी उपाययोजना करा अशा सूचना ही दिल्या.यानुसार तात्काळ कार्यवाही होऊन उपसंचालक स्तरावरून रत्नागिरी जिल्ह्यातील त्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची पगार बिले अप्रू झाली आहेत.यावेळी गौरव पोंक्षे (माखजन),अभिजित सहस्त्रबुद्धे (माखजन्)नितीन जाधव (कसबा) यांनी पाठपुरावा केला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या विषयात जिल्हा ते उपासंचालक कार्यालय या दोन्ही स्तरावर विशेष लक्ष घालून तात्काळ बिलांचे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्याने शिक्षकांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.यामध्ये उपसंचालिका प्रभावती कोळेकर,श्री कळमकर नवनाथ लोखंडे , रत्नागिरी शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, वेतन अधीक्षिका सौ किशोरी करमुसे (रत्नागिरी) आदींचे सहकार्य लाभले.