राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम

राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम

अकोला

            अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडी चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात २९५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पदक पटकाविले. हेमांगीची  आता राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चराठा गावची कन्या असलेली हेमांगी ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असून तिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हेमांगीचे वडील होमगार्ड मध्ये पलटण नायक आहेत. तिच्या या यशात कुटुंबियाचीही महत्त्वाची साथ आहे तसेच  तिचे कोच मंगेश घोगळे, देवगड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, गणेश वांगणकर, डॉ. शशांक साटम यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचीव सीए लक्ष्मण नाईक, श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी हेमांगीचे अभिनंदन केले.