करुळ घाटात ट्रक दरीत कोसळून अपघात, दोन जण जागीच ठार
वैभववाडी
येथील करुळ घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिमेंटने भरलेला ट्रक सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.कोल्हापूरवरून येणारा हा ट्रक घाटातील वळणावर दरीत कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सह्याद्री वनजीव रक्षक हेमंत पाटील, त्यांचे सहकारी तसेच संबंधित तलाठी व कोतवाल यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्यात मोलाचा सहभाग घेतला. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून वैभववाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
konkansamwad 
